बालाजी सरोज भावकाव्य प्रतिष्ठानची अभिमानास्पद घोषणा

देणार साहित्य पुरस्कार
नागपूर : “बालाजी सरोज भावकाव्य प्रतिष्ठान” विविध प्रकारचे साहित्यिक उपक्रम राबवीत असते. साहित्य स्पर्धा , ग्रंथ स्पर्धा , राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलने आजवर आयोजित केली असून पुढेही ते सुरूच राहणार आहेत.
साहित्य हे विविध स्वरूपात लिहिलं जातं . म्हणून अनेक प्रकारचे सातत्याने लेखन करणाऱ्या लेखक , कवींना विविध पुरस्कारांनी सन्मानीत केले जाणार आहे . पुरस्कार हे मान्यवरांच्या विशेष समितीने सुचविल्याप्रमाणे दिले जातील.
१) राष्ट्रसंत स्मृती संत साहित्य पुरस्कार
२) स्व.उद्धव शेळके स्मृती कादंबरी पुरस्कार
३) स्व . सुरेश भट स्मृती मराठी गझल सन्मान पुरस्कार
४) स्व. ना. घ. देशपांडे स्मृती काव्य पुरस्कार
५) स्व. पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती नाट्यलेखन पुरस्कार
६) स्व. के. ज .पुरोहित स्मृती कथा लेखन पुरस्कार
७) स्व. प्राचार्य राम शेवाळकर स्मृती वैचारिक , प्रबोधनात्मक लेखन व वक्ता पुरस्कार
सर्व पुरस्कार नोव्हेंबर २०२३ मधे होणाऱ्या प्रतिष्ठानच्या तिसऱ्या राजस्तरीय मराठी साहित्य संमेलनात आदरपूर्वक प्रदान केले जातील .
मान्यवर साहित्यिकांनी आपला साहित्यिक सविस्तर परिचय दि. ३० जून पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावा .
विशेष – या सन्मानांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही , याची नोंद घ्यावी !
सौ. सरोज संजय अंदनकर
संस्थापक अध्यक्ष
“बालाजी सरोज भावभाव्य ” प्रतिष्ठान नागपूर
पत्ता – सौ.सरोज संजय अंदनकर
शिव इलाईट टाउनशिप गार्डेनिया 503 शंकरपूर रोड न्यू पुनर्वसन खापरी नागपूर
पिन कोड – 441108
मोबाईल नं. 9307907319





