उत्कृष्ट कामगिरीबद्दल कणकवली नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचा रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार
राज्यात नगरपंचायत चा पहिला क्रमांक आल्याबद्दल केले कौतुक
पुढील कारकिर्दीसाठी दिल्या शुभेच्छा
कणकवली शहराच्या गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत उत्कृष्ट व यशस्वीपणे नगराध्यक्ष पदाची व उपनगराध्यक्षपदाची धुरा सांभाळल्याबद्दल व मुख्याधिकारी म्हणून चांगले काम केल्याबद्दल तसेच शहराला विकास प्रक्रियेत जिल्ह्यात अव्वल स्थानी आणून ठेवल्याबद्दल व कणकवली नगरपंचायत चा राज्यात पहिला क्रमांक आल्याबद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व मुख्याधिकारी अवधूत तावडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरपंचायत च्या वतीने देखील रवींद्र चव्हाण यांचा व आमदार नितेश राणे यांचा सत्कार केला. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत, भाई सावंत, नगरसेवक रुपेश नार्वेकर, शिशिर परुळेकर, विराज भोसले, अभिजीत मुसळे, संजय कामतेकर, रवींद्र गायकवाड,प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, उर्वी जाधव, कविता राणे, सुप्रिया नलावडे, मेघा गांगण, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक बंडू गांगण, महेश सावंत, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे,किशोर राणे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, प्राची कर्पे, संजना सदडेकर, सरपंच संदीप मेस्त्री, बाळा सावंत, बाळा पाटील, नामदेव जाधव, मनोज धुमाळे,ध्वजा उचले, सुमित कुबल, रुजुता ताम्हाणेकर आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर/ कणकवली