पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे वेंगुर्लेत भाजपाच्या वतीने जलौश्यात स्वागत होणार

भाजपाच्या तालुका बैठकीत पालकमंत्र्यांच्या स्वागताचे नियोजन

सावंतवाडी प्रतिनिधि

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नाम.रविंद्र चव्हाण साहेब हे सिंधुदुर्ग चे पालकमंत्री झाल्यावर प्रथमच वेंगुर्ले तालुक्यात शनिवार दिनांक ६ मे रोजी दुपारी ३ वाजता वेंगुर्ले नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात येणार आहेत .

तसेच त्याठीकाणी त्यांच्या हस्ते राज्यात शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्‍याबद्दल वेंगुर्ले नगरपरिषदेच्या प्रशासनाचा व लोकप्रतिनिधींचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे .
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या प्रशासनाचे खास कौतुक करण्यासाठी येणाऱ्या पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे भाजपाच्या वतीने स्वागत करण्यासाठीच्या नियोजनाची सभा तालुका कार्यालयात जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली . यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे वेंगुर्लेत जल्लोषात स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले , तसेच महिला मोर्चाच्या वतीने पालकमंत्र्यांचे औक्षण करण्यात येणार आहे .
यावेळी तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा चिटणीस निलेश सामंत , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , महीला अध्यक्षा स्मिता दामले , युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर , महीला मोर्चाच्या सारीका काळसेकर , शक्तीकेंद्र प्रमुख विजय बागकर – महादेव नाईक – सुधीर गावडे , किसान मोर्चाचे बाळु प्रभु , पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील , ओबिसी सेलचे रमेश नार्वेकर , माजी सरपंच विजय रेडकर , रविंद्र शिरसाठ , शेखर काणेकर , उदय गावडे , श्रीधर गोरे , देवेंद्र वस्त , वृंदा मोर्डेकर , रसिका मठकर तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते .

error: Content is protected !!