श्री देवी भवानी मंदिराचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात

कुडाळ : श्री देवी भवानी मंदिराचा पाचवा वर्धापन दिन २९ एप्रिल ते २ मे २०२३ या कालावधीत संपन्न झाला. या निमित्त २९ एप्रिल २०२३ रोजी भवानी मंदिरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. नेरूर ग्रामपंचायत सरपंच भक्ती घाडी, ओबीसी सेलप्रमुख रुपेश पावसकर, नेरुर ग्रामपंचायत माजी सरपंच शेखर गावडे, माजी उपसरपंच समद मुजावर, सदस्य प्रभाकर गावडे, भवानी मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यानी दीपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात केली. यावेळी ६० रक्तदात्यांनी उपस्थिती दर्शवली. त्यापैकी ३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यासाठी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी यांच्याकडूनही मोलाचे सहकार्य लाभले.
१ मे रोजी निमंत्रित जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नेरुर ग्रामपंचायत सरपंच भक्ती घाडी, सदस्या अरुणा चव्हाण, निकीता सडवेलकर, माजी ग्रामपंचायत सदस्या दिव्या गावडे, भवानी बचतगट व ब्राह्मण बचतगटाच्या महिला यांच्या उपस्थितीत फुगडी स्पर्धचे दीपप्रज्वलन करण्यात आले. या स्पर्धेत ८ संघ सहभागी होते.
या स्पर्धेत खाजनादेवी आसोली संघाने प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक श्री देवी सातेरी अणसूर संघ तर सखी फुगडी संघ पावशीने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून भूषण बाक्रे आणि अदिती दळवी यांनी परीक्षण केले. दिव्या दीपक गावडे, प्रीती उत्तम गावडे, गौरी गवाणकर, प्रांजल गावडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच या स्पर्धेसाठी गणेश म्हाडदळकर, चिन्मय सडवेलकर, राकेश गावडे, बाबल गावडे, उत्तम गावडे, दिव्या गावडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
२ मे रोजी लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स आणि त्यानंतर रात्री १० वाजता जय हनुमान दशावतार यांचा नाट्य प्रयोग सादर करण्यात आला. यासाठी भवानी मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते, भवानी बचतगट, ब्राह्मण बचतगट यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या सर्वांचे आयोजकांच्या वतीने अध्यक्ष धोंडी कांबळी यांनी सर्वांचे आभार मानले.
या उत्सवास आमदार वैभव नाईक, अतुल बंगे, माजी मनसे तालुका आणि पिंगुळी ग्रामपंचायत बाबल गावडे, पिंगुळी व्यापारी संघ उपाध्यक्ष व मनसे माजी उपतालुका अध्यक्ष दीपक गावडे, शेखर गावडे, विकास कुडाळकर, संदेश नाईक, प्रभाकर गावडे, रुपेश पावसकर, सुनील गावडे, विनय गावडे, साईराज जाधव, महेश गवस, मिलिंद धोंड यांनी भेट दिली.

प्रतिनिधी, कुडाळ

error: Content is protected !!