पिंगुळी आंबेडकरनगरवासियांचे उपोषण तात्पुरते स्थगित

कुडाळ ; पिंगुळी आंबेडकरनगर-संकल्पनगरमध्ये स्ट्रीटलाईट पोल उभारण्याच्या कामात मागासवर्गीय वस्तीसाठी आलेल्या निधीचा अपहार करुन तत्कालीन सरपंच निर्मला पालकर, ग्राविकास अधिकारी खोबरेकर, महावितरणचे शाखा अभियंता व ठेकेदार मे. सिद्धेश्वर यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा आरोप पिंगुळीवासियांनी केला आहे. परंतु, दोषीवर अद्याप कारवाई झालेली नाही. या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ पिंगुळी ग्रामस्थानी आज, १ मे रोजी सकाळी येथील पंचायत समितीसमोर आंदोलन केले.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. दोशींवर कारवाई न झाल्यास ८ मे रोजी पंचायत समिती समोर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा ग्रामस्थांनी दिला. पिंगुळी सरपंच अजय आकेरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले.
पिंगुळी आंबेडकरनगर-संकल्पनगरमध्ये स्ट्रीटलाईट पोल उभारणे काम १५ व्या वित्त आयोगात प्रस्तावित होते. या कामाची निविदा २५०५००/- रुपये होती. परंतु, निविदा प्रक्रिया केवळ कागदोपत्री दाखवून कामाचे खोटे एमएससीबी मुल्यांकन करुन ठेकेदार मे. सिद्धेश्वर इलेक्ट्रीक्स यांना रक्कम देण्यात आली. प्रत्यक्षात जागेवर एकही पोल उभारण्यात आला नाही. त्यामुळे मागासवर्गीय वस्तीसाठीचा निधीचा अपहार करुन तत्कालीन सरपंच निर्मला पालकर, ग्रामसेवक खोबरेकर, महावितरणचे शाखा अभियंता व ठेकेदार मे. सिद्धेश्वर यांनी संगनमताने भ्रष्टाचार केला असा आरोप केला. या प्रकरणी ग्रा.पं. पिंगुळी यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यांनी आपल्या विभागामार्फत सदरच्या प्रकरणाची चौकशी पडताळणी होऊन देखील दोषींवर अद्याप कारवाई झाली नाही. या प्रकरणाची दखल घेतली नसल्याने सर्व आंबेडकरनगर व संकल्पनगरवासीय उपोषण केले. यावेळी भाजप माजी जि. प. सदस्य रणजित देसाई यांनी उपोषणकर्त्याना भेट दिली. यावेळी ग्रा. पं. सदस्य केशव पिंगुळकर, गोविंद पिंगुळकर, विजय पिंगुळकर, अभिजीत जाधव, संजय पिंगुळकर, कविता पिंगुळकर, मयुरी धुरी, प्रवीण पिंगुळकर, अशोक पिंगुळकर, कल्पना वेंगुर्लेकर, नेहा पिंगुळकर, गौरव पिंगुळकर, रणजीत पिंगुळकर, ज्योती पिंगळकर आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी, कुडाळ