चिंदर येथील रस्ता कामाचा शुभारंभ

पालकमंत्री रविंद्र चव्हाण, मा.खासदार निलेश राणे यांचे विशेष सहकार्य
श्री ब्राम्हनदेव मंदिर चिंदर सडेवाडी च्या रस्त्याच्या खडिकारण डांबरीकरण कामाचा शुभारंभ भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंदर येथील जेष्ठ ग्रामस्थ वसंत सावंत यांच्या हस्ते केले गेले.पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या सहकार्याने जनसुविधे अंतर्गत हे काम मंजूर करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या सोबत चिंदर उपसरपंच दीपक सूर्वे, वि का स संस्था चेअरमन देवेंद्र हडकर, शक्तिकेंद्र प्रमुख दत्ता वराडकर, आचरा विभागीय भा ज प चे मनोज हडकर, प्रकाश मेस्त्री, प्रकाश हडकर, प्रकाश चिंदरकर, पी डी हडकर, मोरेश्वर गोसावी, गणपत चिंदरकर,दीपक हडकर,रोहन वराडकर,आदी ग्रामस्थ उपस्थित होते . गावात भाजप तर्फे विकास कामे मंजूर करून सुविधा निर्माण केल्या जात असल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
आचरा / अर्जुन बापर्डेकर





