कुडाळ मंडलातील एकूण ५२ बूथवर ‘मन की बात’ संपन्न

कुडाळ ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाची शताब्दीचा भाग रविवारीप्रदर्शित झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केले. देशभरात १०० व्या भागाचा प्रसारण सोहळा प्रत्येक गावागावात पार पडला. याच पार्श्वभूमीवर कुडाळ मंडलातील एकूण ५२ बूथवर मन की बात या कार्यक्रमाचा भरगच्च प्रतिसाद लाभला असल्याची माहिती कुडाळ मंडल अध्यक्ष विनायक राणे यांनी दिली आहे.
प्रतिनिधी, कुडाळ