वैभववाडी मध्ये देखील ठाकरे गटाला आमदार नितेश राणें कडून धक्का

वैभववाडी मध्ये ठाकरे गटाचे नगरसेवक भाजपा मध्ये
कणकवली मतदारसंघात ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के
देवगड पाठोपाठ वैभववाडी तालुक्यातील आमदार नितेश राणेंनी ठाकरे गटाला धक्का दिला असून, ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांनी ठाकरे गटाला रामराम करत भाजपाचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे वैभववाडी मध्ये ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान भाजपामध्ये प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांमध्ये
प्रदीप प्रकाश रावराणे, श्रध्दा रोहित रावराणे, सुभाष अनाजी रावराणे, रोहित रावराणे-युवा तालुका अध्यक्ष उद्धव ठाकरे गट यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर /कणकवली