घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सस्मिता मोहंती यांची ‘ब्रेन फीड २०२३’ पुरस्कारासाठी निवड

जयसिंगपूर : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका, प्राचार्य सस्मिता मोहंती यांची ‘ब्रेन फीड इनोव्हेटिव्ह एज्युकेटर्स २०२३’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे.भारतातील शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण योगदान देणाऱ्यांच्या यादीमध्ये ब्रेन फीड मासिकाच्या मुखपृष्ठावर त्या झळकल्या आहेत.
केवळ पाचशे विद्यार्थ्यांवर सुरू झालेले इंटरनॅशनल स्कूल मोहंती यांच्या समर्पक शैक्षणिक कार्यामुळे 5500 विद्यार्थी संख्येपर्यंत गेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीएससी, सी एआ ई (केंब्रिज स्कूल),आय.बी स्कूल ची सुरुवात झाली. त्याचबरोबर बेळगाव येथे इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्यामध्ये ही त्यांचा वाटा मोठा आहे. सध्या पुणे व इतर महत्त्वाच्या ठिकाणी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
2012 मध्ये त्या प्राचार्य पदावर घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये रुजू झाल्या त्यांनी जिद्दीने या स्कूलची उभारणी केली. त्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे हे स्कूल नावारूपाला आले. राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर या स्कूलला अनेक पुरस्कार मिळाले. एमआयएसए, टीएआयएसआय आणि सहोदया या संस्थांचे सदस्यत्व इंटरनॅशनल स्कूल ला मिळाले. याद्वारे विविध क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध अभ्यास सहलींचे आयोजन करण्यात येते. स्कूलच्या 15 विद्यार्थ्यांची सिंगापूर येथे प्रशिक्षणासाठी निवड मोहंती यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
इंटरनॅशनल स्कूल ला डेक्कन बोर्डिंग चा ‘अ’ दर्जा त्यांनी मिळवून दिला. त्याचबरोबर या विभागात महाराष्ट्र राज्यात एज्युकेशन वर्ल्ड मॅक्झिन यांच्या वतीने पहिला क्रमांक मिळाला. तर देशात तिसरा क्रमांक मिळाला. स्कूलचा परीक्षा विभाग उत्तमरीत्या विद्यार्थ्यांना परीक्षा पूर्व, परीक्षेत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करतो. त्यासाठी सराव करून घेणे, परीक्षा घेणे व लवकरात लवकर निकाल लावण्याचे कार्य करतो.यासाठी प्राचार्य मोहंती यांनी चांगले नियोजन केले आहे. स्कूल मधून उत्तम गुणांनी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी देश विदेशात आणि चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवला आहे.
स्कूलने ग्रीन स्कूल पुरस्कार, ब्रिटिश कौन्सिल इंटरनॅशनल पुरस्कार, बेस्ट इमर्जिंग स्कूल पुरस्कार मिळविले आहेत. मोहंती या ब्रिटिश कौन्सिलच्या अँबेसिडर म्हणून देखील काम पाहतात.
मोहंती यांनी समाजाप्रती आपले उत्तरदायित्व सिद्ध करताना ‘स्वच्छ भारत, बेहतर इंडिया’ यासाठी कार्य केले, 1 लाख 60 हजार रुपये फंड विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन जमा केला. हॅबिटॅट इंडिया प्रोजेक्ट मध्ये 3 लाख 50 हजार रुपये जमा करून गरिबांना स्वच्छतागृह बांधण्यासाठी दिले. अनाथ आश्रम, वृद्धाश्रम यांना मदत, क्रीडा साहित्याचे वाटप,हाउसकीपिंग कामगारांसाठी इंग्लिश स्पिकिंग कोर्सेस, सरकारी शाळांना संगणक प्रशिक्षण, वृक्ष लागवड यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. सहोदया स्कूल सोबत लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्रॅम त्यांनी घेतला.यामध्ये प्राचार्य,शिक्षक यांना प्रशिक्षण दिले.
आज पर्यंत सस्मिता मोहंती यांना बेस्ट टीचर इन द वर्ल्ड,राष्ट्रीय विकास ज्योती पुरस्कार,भारतीय साहित्य सन्मान, शिक्षक रत्न पुरस्कार, शिक्षक भारती पुरस्कार, बेस्ट टीचर पुरस्कार मिळाले आहेत. याबरोबरच डॉ. एपीजे अब्दुल कलाम आऊटस्टँडिंग प्रिन्सिपल अवॉर्ड, अदर्श विद्या सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार,ग्लोबल टीचर रोल मॉडेल अवॉर्ड, 2016 मध्ये अलर्ट नॉलेज सर्विसेस यांच्याकडून प्रभावी शंभर प्राचार्यांच्या मध्ये मोहंती यांची निवड झाली.माजी मानव आणि संसाधन मंत्री स्मृती इराणी यांनी देखील पत्र पाठवून त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेतली आहे.
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. स्कूल ला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी त्या विविध उपक्रम राबवत असतात. उत्तम प्रशासन कौशल्य,नियोजन याद्वारे त्या आजही स्कूल ला सर्वोच्च दर्जा प्राप्त करून देण्यासाठी कष्ट घेत आहेत. त्यांची ‘ब्रेन फीड इनोव्हेटिव्ह एज्युकेटर्स 2023’ पुरस्कारासाठी झालेली निवड हे त्याचेच द्योतक आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी, आयआयटी चे संचालक डॉ.वासू,स्कूलचे सर्व शिक्षक,कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.