कवी अरुण म्हात्रे यांना सावली पुरस्कार प्रदान

बदलापूर/ठाणे : “अरुण म्हात्रे यांनी अनेक नवकवींना केवळ व्यासपीठ मिळवून दिले नाही, तर कवितेचा वारसा वृद्धिंगत करण्याचे काम ते सातत्याने करीत आले आहेत. त्यांनी स्वःतच्या कवितेइतकेच इतर कवींच्या संवेदनाही समजून घेतल्या. सध्याचे कवी फक्त स्वतःच्याच कविता वाचतात. इतरांच्या कविता वाचण्यात त्यांना रस नसतो. म्हात्रे यांचे तसे नाही. ते इतरांच्या कवितेवरही प्रेम करतात. त्यांनी कवींमध्ये तयार झालेल्या सांप्रदायिकतेला छेद दिला आहे. “. गौरव उदगार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी काढले
बदलापूर येथील पेंडूलकर सभागृहात गायक, पटकथाकार, लेखक आणि दिग्दर्शक अशोक हांडे यांच्यातर्फे सावली गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदरचा पुरस्कार हा पाणवठा या संस्थेद्वारे देण्यात आला. पाणवठा ही संस्था अपंग प्राण्यांचे अनाथाश्रम चालवते. प्राण्यांचे तेही अपंग म्हणजेच अपघातग्रस्त किंवा जखमी अवस्थेतील प्राण्यांची सुटका करून त्यांची देखभाल व सुश्रुषा केली जाते.
या संस्थेचे संस्थापक श्री व डॉ सौ अर्चना गणराज जैन यांनी त्यांच्या संस्थेतील स्वयंसेवकांना सोबत घेऊन आजवर साडे चार हजाराहून प्राण्यांना बरे केले आहे. भारतीय किंवा आपल्या येथील स्थानिक प्रजातींच्या जवळपास दोनशेहून अधिक गायींचे मोफत वाटप गरजू शेतकऱ्यांना केलेले आहे.
तब्बल साडे तीनशे हून अधिक आरोग्य शिबिरे आणि 3000 हून अधिक आदिवासींवर मोफत औषधोपचार पाणवठा या संस्थे द्वारे केले गेले आहेत.

error: Content is protected !!