नेरूरमध्ये घरावर झाड कोसळून मोठे नुकसान

मेस्त्री कुटुंबाला लोकप्रतिनिधींचा मदतीचा हात

नेरूर येथील रहिवासी राजू मेस्त्री यांच्या घरावर अचानक झाड कोसळून घराचे मोठे नुकसान झाले. या घटनेची तातडीने दखल घेत लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून मेस्त्री कुटुंबाला आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली.
जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर, देवस्थान कमिटीचे माजी अध्यक्ष प्रदीप नाईक आणि पंचायत समिती सदस्या दीप्ती नाईक यांच्या विशेष प्रयत्नांतून ही मदत मिळविण्यात आली. नुकसानग्रस्त मेस्त्री कुटुंबाला तलाठी कांबळे यांच्या हस्ते आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
यावेळी मधु ठाकूर, नेरूर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आनंद नेरुरकर, अमोल शुंगारे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
संकटाच्या प्रसंगी लोकप्रतिनिधींनी तत्परतेने दखल घेत मदतीचा हात दिल्याबद्दल मेस्त्री कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!