युवा नेते आणि उद्योजक प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयडियल स्पेशल स्कूल मध्ये शैक्षणिक भेटवस्तू वाटप

कणकवली:मयूर ठाकूर
युवा नेते आणि उद्योजक प्रताप भाई भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल स्पेशल स्कूल च्या मुलांना शैक्षणिक भेटवस्तू वाटप करून वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
सन्माननीय श्री.कान्हा मालंडकर, श्री. प्रदीप कदम,श्री.सलमान शेख तसेच श्री.सूर्यकांत वारंग यांनी दिव्यांग मुलांना शैक्षणिक भेटवस्तू वाटून वाढदिवस एका आगळ्यावेगळ्या प्रकारे साजरा केला आणि एक नवीन पायंडा समाजापुढे ठेवला आहे.
हा उपक्रम समाजाप्रती एक आदर्श निर्माण करून देणारा ठरलाय.






