आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वरवडे मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संपन्न

कणकवली:मयूर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्था आणि भंडारी एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीनंतर योग्य नोकरी, सरकारी नोकरीच्या संधी निवडण्याच्या उद्देशाने शासकीय नोकरीसाठी निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन जेष्ठ मार्गदर्शक वरिष्ठ अनुवाद अधिकारी केंद्रीय वस्तू तसेच सेवा कर मुंबई भारत सरकार या सेवेत असणारे श्री.सत्यवान यशवंत रेडकर यांनी विद्यार्थ्यांना बारावीनंतर किंवा पदवीनंतर कोणत्या शाखेकडे गेल्यानंतर कोणत्या परीक्षांच्या माध्यमातून बँक खाते, पोलीस खाते, महसूल खाते,आयकर खाते, किंवा तंत्रज्ञानासंदर्भातले खाते यामध्ये नोकरीच्या संधी केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये कशा उपलब्ध आहेत आणि तिथपर्यंत आपण पोहोचण्यासाठी कोणत्या परीक्षा देणे गरजेचे आहे या संदर्भातलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
सर्वप्रथम ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल यांच्या शुभहस्ते श्री सत्यवान रेडकर यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर श्री.सत्यवान रेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्ष बुलंद पटेल सर इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम तसेच इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक हेमंत पाटकर यांनी केले.






