फोंडाघाट येथील धबधब्यांचे सुशोभीकरण करा

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची उपवनसंरक्षकांकडे मागणी

कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील निसर्गरम्य धबधबे पर्यटनाच्या दृष्टीकोनातून सुशोभिकरण करण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्याकडे केली आहे.

याबाबतचे निवेदन त्यांनी संरक्षक श्री शर्मा यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर असून कणकवली तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीतील फोंडाघाट हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीकोनातून निसर्गरम्य ठिकाण आहे. पावसाळी हंगामात सुंदर असे फोंडाघाटात धबधबे प्रवाहीत होतात व असंख्य पर्यटक लोक धबधब्याची मजा लुटत असतात. परंतु प्रवाहीत असणाऱ्या धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कुठलीही सुविधा नाही. तरी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुरक्षित असे सुशोभिकरण आपल्या विभागाकडून झाल्यास पर्यटक मोठ्या प्रमाणात फोंडाघाट येथे आकर्षित होऊ शकतात व पर्यटनाला चालना मिळू शकते. तरी आपल्या विभागाकडून फोंडाघाटातील पावसाळ्यात प्रवाहीत असणाऱ्या धबधब्यांचे सुशोभिकरण व्हावे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान उपवनसंरक्षक श्री शर्मा यांनी कणकवलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांना याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
यावेळी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, प्रदेश चिटणीस सुरेश गवस,किसान सेल जिल्हाध्यक्ष दिपक देसाई, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष उमाकांत वारंग, अल्पसंख्याक प्रदेश महासचिव शफीख खान,प्रांतिक सदस्य विलास गावकर्,कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, सावंतवाडी महिला तालुका अध्यक्ष सौ. रिद्धी परब, महिला जिल्हा उपाध्यक्ष अध्यक्ष सौ मानसी देसाई, डॉक्टर तुषार भोसले, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष विलास पावसकर,आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!