पालकमंत्री नितेश राणे व आमदार प्रमोद जठार यांच्या माध्यमातून बेळणे, तिवरे, डामरे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 20 लाखांचा निधी मंजूर

पंचायत समिती सदस्य चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांनी मानले आभार
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ग्रामीण रस्ते दुरुस्तीसाठी ग्रामीण मार्ग क्रमांक 168 बेळणे, तिवरे, डामरे रस्ता दुरुस्ती करणे या कामासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग नितेश राणे यांनी आमदार प्रमोद जठार साहेब यांनी केलेल्या शिफारशीनुसार सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 20 लाख रुपये मंजूर केले. या कामासाठी पंचायत समिती सदस्य बबलू सावंत यांनी विशेष प्रयत्न केले होते. तीवरे डामरे पंचक्रोशीच्या वतीने बबलू सावंत व आमदार प्रमोद जठार व पालकमंत्री नितेश राणे विशेष आभार व्यक्त करण्यात आल्याचे श्री सावंत यांनी सांगितले.






