मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना बरखास्त करून अटक करा

कणकवली तालुका काँग्रेसची प्रांताधिकार्यांमार्फत शासनाकडे मागणी
भारताची लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, या लोकशाही व्यवस्थेत निवडणुकांना अनन्यसाधारण महत्व आहे.
निवडणुका या स्वतंत्र व निष्पक्षपणे पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. स्वायत्त असलेला निवडणूक आयोग मागील काही वर्षापासून सत्ताधारी पक्षाच्या हातातील बाहुले बनल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोग सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी निवडणुकीत मॅच फिक्सिंग करत असल्याचा आतापर्यंत संशय होता पण निवडणूक आयोगातील अभूतपूर्व मतभेद उघड झाल्याने निवडणूक आयोगात सावळा गोंधळ आहे, त्यांचा कारभार पारदर्शक नाही हे उघड झाले आहे. एसआयआरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे काढली जात आहेत हे लोकशाही अत्यंत घातक आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार हे एकतर्फी निर्णय घेत असल्याचे त्यांचे सहकारी दोन निवडणूक आयुक्त श्री. सुखबीर सिंग संधू आणि श्री. विवेक जोशी यांनी सांगितल्याची बातमी इंडियन एक्स्प्रेस या दैनिकात प्रसिद्ध झाली आहे. गेल्या १० महिन्यांत वरील दोन निवडणूक आयुक्तांनी किमान १४ वेळा ज्ञानेकुमार यांच्या निर्णयावर अधिकृतपणे आक्षेप नोंदवले आहेत. ‘विशेष सखोल पुनरावृत्ती’ (SIR) प्रक्रियेबाबत, नवीन मतदारांची अनधिकृतपणे केलेली नोंदणी, नावे वगळणे आणि निवडणूक आयोगाच्या आयटी (IT) प्रणालीचे केलेले केंद्रीकरण यांचा यात समावेश होता—मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) यांनी हे निर्णय दोन्ही सहकाऱ्यांना अंधारात ठेवून घेतले. हे निर्णय हुकूमशाही पद्धतीचे आहेत.
पश्चिम बंगालमध्ये ९२ लाख मतदारांची नावे वगळली, बिहारमध्ये लाखो नावे वगळली, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या वेळी ४७ लाख बोगस मतदार वाढवले असे अनेक घोटाळे करण्यात आले आहेत. विरोधी पक्षनेते मा. श्री. राहुल गांधी जी यांनी निवडणूक आयोगातील घोटाळ्याची पोलखोल पुराव्यासह केली होती. सत्ताधारी भाजपला अनुचित लाभ मिळवून देण्यासाठी निवडणूक यंत्रणेवर ताबा मिळवून त्यात फेरफार केले जात आहेत, असा इशाराही त्यांनी देशाला सातत्याने दिला होता. इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीने यावर शिक्कामोर्तबच केले आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांची कृती देशद्रोहाची आहे, त्यांनी लोकशाही व संवैधानिक मूल्ये पायदळी तुडवली आहेत, लोकशाहीची हत्या केली आहे. देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी देशद्रोही ज्ञानेशकुमार यांना त्यांच्या पदावरून बरखास्त करून अटक करणे गरजेचे आहे,
अशी आमची मागणी आहे. असे या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना कणकवली तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर ,शहराध्यक्ष अजय मोरये,अनिल डेगवेकर ,महेश तेली ,संजय राणे ,राजेंद्र कदम, बाळू मेस्त्री , व्हि के सावंत , आतिश जेठे प्रदीप कुमार जाधव व अन्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.






