मॅरेथॉन स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे च्या आध्या चौगुले चे यश

कणकवली/मयूर ठाकूर

स्पोर्ट फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने प्रगत विद्या मंदिर रामगड येथे आयोजित करण्यात आलेल्या रामगड हिल दहा किलोमीटर रन स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज कॉमर्स आणि सायन्स वरवडे च्या प्रशालेची विद्यार्थिनी आध्या राकेश चौगुले हिने 18 वर्षाखालील मुलींच्या गटात नेत्रदीपक यश संपादन केले आहे. नुकतीची स्पर्धा रामगड येथे पार पडली.
यशाबद्दल तिचे ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल सर,संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे,सहसचिव निलेश महेंद्रकर खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम सल्लागार डी. पी. तानावडे सर,आयडियल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई,तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!