चंद्रमोहन पेडणेकर यांचे निधन

येथील मधुबन सोसायटी लक्ष्मी वाडी येथील रहीवासी चंद्रमोहन नारायण पेडणेकर यांचे सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी दु:खद निधन झाले.
कुडाळ वायमन गार्डन मधे नोकरी आणि त्या नंतर घरांची प्लॅन काढुन देणे, सत्यनारायण पुजेची मखरे बनविणे हे व्यवसाय सुरु केले. भंडारी समाज कुडाळ मध्ये कार्यरत होते. तसेच जनतादल आणि समाजवादी विचारसरणीने काम करणारे होते.
कुडाळ शहर ग्रामपंचायत माजी सदस्या स्वाती पेडणेकर यांचे ते पती होत. समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर यांच्या सोबत त्यांचा प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग असायचा. पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, जावई, नातवंडे, सुना असा परीवार आहे. पत्रकार स्नेहल पेडणेकर यांचे ते वडिल होत.






