चिंदर पालकरवाडी येथील चंद्रकला पालकर यांचे निधन

चिंदर पालकरवाडी येथील रहिवासी चंद्रकला चंद्रशेखर पालकर (वय ५५) यांचे शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी चिंदर पालकरवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रकला पालकर या चिंदर ग्रामपंचायतीच्या सरपंच/प्रशासक स्वरा पालकर यांच्या सासू तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर पालकर यांच्या पत्नी होत.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दोन मुली, दीर, जाऊ, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!