कुडाळ पर्यंत चालले आणि व्याजी पैसे फिटले!

व्याजी पैशांच्या कणकवलीतील या पैजेची सर्वत्र चर्चा
तब्बल 8 लाखांचा व्यवहार एका पैजेत मिटला
कणकवली शहरातील चार जणांनी एका व्याजी पैसे देऊन वसूल करणाऱ्या कडून घेतलेली रक्कम परत करण्याची मागणी केली. पैसे परत करण्याचा तगादा त्या पैसे देणाऱ्याने लावला होता. परंतु एवढ्यात हे पैसे द्यायला जमणार नाही हे सांगताच पैसे देणाऱ्याने त्यांची लायकी काढायला सुरुवात केली. आणि यातूनच तब्बल 4 जणांचे मिळून सुमारे आठ लाखाच्या रकमेवर पैज लागली. या पैजी मध्ये कुठेही न थांबता कणकवली वरून कुडाळ मधील आरएसएन हॉटेलच्या चौकापर्यंत चालत जायचे. कुठेही बसायचे नाही, थांबायचे नाही व कुठेही गाडीचा वापर करायचा नाही, अशा एक ना अनेक अटी या पैजी मध्ये ठेवल्या गेल्या. आणि या अटींमधूनच 8 लाख माफ होतात तर कुडाळ काय सावंतवाडी, गोव्या पर्यंत चालायची त्या 4 जणांनी तयारी दाखवली. अखेर पैज लागली. व्याजी पैसे घेतलेले ते 4 जण अटी व नियम पाळतात की नाही याकरिता देखरेख ठेवण्यासाठी पथक नेमले गेले. या पथकाने या सर्वांवर देखरेख ठेवायची इथपर्यंत सर्व ठरले. व झालेल्या बोली प्रमाणे पैज रात्री सुमारे साडेदहा ते अकराच्या दरम्यान सुरू झाली. व्याजी पैसे घेतलेले पैज जिंकण्याच्या उद्देशाने कुडाळच्या दिशेने रात्री चालू लागले आणि हा हा म्हणताना ओरोस पर्यंत पोहोचल्यानंतर मात्र पैज लावणाऱ्याला घाम फुटला. यामध्ये त्यातील एकाला पैजेचे निकष मोडण्यासाठी फोडण्याचा देखील प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. पण पाच जणांनी एकीचे बळ दाखवत पहाटे सुमारे तीन-साडेतीन च्या दरम्यान कुडाळ आरएसएन हॉटेलचा चौक गाठला. आणि तेथे मोठा जल्लोष देखील केला. आणि तब्बल 4 जणांची मिळून 8 लाखांची पैज त्यांनी जिंकली. आणि 8 लाख रुपये फिटले. कणकवली मध्ये त्या चौघांना लागलेल्या या जॅकपॉटची चर्चा सर्वत्र सुरू आहे.






