माजी सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपण; शाल व रोपटे देऊन सन्मान

नगरसेवक मंदार शिरसाट व कुडाळ शहर ठाकरे शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम
भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशाच्या रक्षणासाठी योगदान देणाऱ्या माजी सैनिकांचा सन्मान आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उपक्रम कुडाळ येथे उत्साहात राबविण्यात आला. नगरसेवक मंदार शिरसाट व कुडाळ शहर ठाकरे शिवसेनेच्या वतीने आयोजित या उपक्रमात माजी सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
देशासाठी आयुष्य वेचलेल्या माजी सैनिकांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त माजी सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून प्रत्येक माजी सैनिकाला शाल व रोपटे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना नगरसेवक मंदार शिरसाट म्हणाले, “माजी सैनिकांच्या त्यागामुळे आपण आज स्वतंत्र हवेत श्वास घेत आहोत. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून हरित कुडाळचा संकल्प केला आहे. माजी सैनिकांचा सन्मान करणे हे आमचे परमभाग्य आहे.”
कार्यक्रमास माजी सैनिक शंकर मेस्त्री, सिद्धार्थ पाटील, सायमंड रॉड्रिक्स, अनिल नाईक, लाडू शेडगे, नारायण गावडे, प्रवीण परब, भैय्या राऊळ, महेश शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी सिद्धार्थ पाटील यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रेया परब, तालुकाप्रमुख राजन नाईक, उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर, युवासेना उपतालुकाप्रमुख स्वप्निल शिंदे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, शहर निरीक्षक सुशील चिंदरकर, उपशहरप्रमुख शैलेश काळप, गुरु गडकर, युवासेना शहर समन्वयक अमित राणे, विनय पालकर, परब, नाना कुडाळकर, शारबिद्रे, सुलभा देसाई आदी उपस्थित होते.
माजी सैनिकांचा सन्मान आणि त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.






