यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक,कणकवली कॉलेज कणकवली अभ्यास केंद्राचे पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न.

कणकवली/मयुर ठाकूर.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, कणकवली कॉलेज कणकवली अभ्यास केंद्राच्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ मंगळवार रोजी पार पडला.या कार्यक्रमाचे उद्घाटन कोल्हापूर विभागीय संचालक डॉ. बाळासाहेब लाडगावकर,शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉक्टर प्राध्यापक राजश्री साळुंखे,शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय विजयकुमार वळंजू यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.शिक्षण प्रसारक मंडळाचे एमडीओ माननीय डॉक्टर संदीप साळुंखे,कणकवली कॉलेज कणकवली प्राचार्य माननीय युवराज महालिंगे,केंद्र संयोजक प्राध्यापक श्री एम जे कांबळे,कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक श्री एम डी कांबळे आदी उपस्थित होते.शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉक्टर प्राध्यापक राजश्री साळुंखे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून यश मिळवावे असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब लाडगावकर यांनी विद्यार्थी आपल्या चिकाटीच्या जोरावर कोणत्याही प्रकारचे यश मिळवू शकतो असे सांगत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. तसेच कणकवली कॉलेज कणकवलीचे प्राचार्य माननीय युवराज महालिंगे यांनी पूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला.विद्यार्थ्यांनी शैक्षणिक बौद्धिक विकास घडवावा असे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक श्री एम जे कांबळे,सूत्रसंचालन प्राध्यापक सीमा गडकर यांनी केले. तर आभार प्राध्यापक श्री एम डी कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी प्राध्यापक आर बी चौगुले,प्राध्यापक एच.एम भिसे,प्राध्यापक व्ही सी सावंत, प्राध्यापक एस एस शिरोडकर, प्राध्यापक एस सी डिसोजा,प्राध्यापक एम एस राणे,प्राध्यापक पाटील,प्राध्यापक पी जी लोकरे,प्राध्यापक ए ए मालपेकर, प्राध्यापक डी डी तेंडुलकर, प्राध्यापक एन एम पाटील, प्राध्यापक एन एस घाडीगावकर,सहाय्यक श्री वैभव राणे आदी उपस्थित होते.