//नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षपदी, श्री.प्रदीप सावंत यांची निवड//

सावंतवाडी/मयुर ठाकूर

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, भारत (नेफडो) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी श्री. प्रदीप सावंत यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. “नेफडो” ही संस्था जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरण संवर्धनाची जनजागृती व पर्यावरणाची आवड निर्माण करणे आणि संपूर्ण विश्वाने पर्यावरण वाचवण्या बाबत पुढाकार घेणे हा मुख्य उद्देश समोर ठेऊन स्थापन करण्यात आलेली आहे. देशात पर्यावरण व पर्यटन जनजागृतीचा प्रामाणिक संदेश देण्याचं काम ह्या संस्थेमार्फत चालू आहे. त्याचबरोबर स्त्री-भ्रूण हत्त्या, ग्रामीण भागातील प्रश्न व इतर सामाजिक उपक्रमांवर कार्य करत असून जगातील 78 देशांतील विविध सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या संस्थेशी जोडले जात आहेत.

संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र भूषण श्री.सुयोग धस हे असून, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आदरणीय श्री. पोपटराव पवार तसेच 25 राष्ट्रपती पुरस्कार विजेते यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धन जनजागृतीचं काम चालू आहे.

श्री.प्रदीप सावंत हे गेली 25 वर्षे सोनुर्ली हायस्कूलमध्ये सहा.शिक्षक म्हणून कार्यरत असून, ह्यापूर्वी त्यांनी नै. पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष पदी काम केलं असून त्यांच्या कामाची दखल घेऊन संस्थेने त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी पदोन्नती दिली आहे.श्री.प्रदीप सावंत यांनी गेल्या काही वर्षांत पर्यावरण संवर्धनात आणि जनजागृतीत अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे. त्यामध्ये विशेष म्हणजे वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन, रोपांचे वाटप, जैवविविधता आणि तिच्या संवर्धनाचे महत्व, जलव्यवस्थापन, यांसंबंधी विविध उपक्रम राबविले आहेत. मार्च ते मे महिन्यांत पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या भागात पक्षांसाठी दाणा- पाण्याची उपलब्धता करून देण्याचे काम गेली ७/८ वर्षे ते विद्यार्थ्यांच्या मदतीने अविरत करत आहेत.
त्यांच्या ह्या विशेष कार्याबद्दल “नेफडो”च्या राज्य पातळीकडून विशेष दखल घेऊन कोंकण विभागातील जिल्ह्यामध्ये सक्रिय राहून विशेष कार्य करणाऱ्या पदाधिकारी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांची सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या ह्या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्री.सुयोग धस, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.दिपक भवर, सचिव श्री.सचिन वाघ, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.बादल बेले, उपाध्यक्ष श्री.प्रकाश कदम, सचिव बापू परब, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉ. प्रीती तोटावार, उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे, महासचिव आसिया रिजवी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

श्री. प्रदीप सावंत यांची संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल कोकण विभाग अध्यक्ष शिवाजी पाटील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्या महिला सल्लागार सौ.संजना गवस, जिल्हा महिला अध्यक्षा सौ. पूजा गावडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!