सिंधुदुर्ग भाजपच्या अध्यक्षपदी प्रभाकर सावंत यांची वर्णी लागण्याची शक्यता?

तर रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष पद माजी आमदार प्रमोद जठरांकडे?

भाजपच्या पक्षांतर्गत खांदे पलटाकडे सर्वांचेच लक्ष

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा भाजपामध्ये आता खांदेपालट होण्याची शक्यता असून, सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या अध्यक्षपदी असलेल्या राजन तेली यांचा कार्यकाळ संपल्याने आता या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा प्रभाकर सावंत यांच्याजवळ जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष व भाजपाचे प्रदेश चिटणीस व देवगड मतदार संघाचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा भाजपाचे अध्यक्ष पद दिले जाण्याची शक्यता आहे. भाजपाने लोकसभे करिता मोर्चेबांधणी सुरू केली असून लोकसभा निवडणुकीत भाजपाचा उमेदवार विजयी करण्यासाठी रणनीती आखली जात आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील भाजपाच्या अध्यक्षपदावर वर्णी लावत असताना अनुभवी चेहऱ्याकडे जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान कोकण विभागाची जबाबदारी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिल्यानंतर मूळ भाजपाच्या अनुभवी पदाधिकाऱ्यांकडे आता जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यात प्रभाकर सावंत यांनी भाजपाच्या जिल्हा पदांवर काम केले आहे. तर यापूर्वी प्रमोद जठार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाच्या अनेक पदांवर कार्यरत देखील होते.रत्नागिरीत सध्या ते ठाण मांडून असल्याने या दोन्ही संभाव्य नावाबाबत भाजपच्या गोटात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

सिंधुदुर्ग /प्रतिनिधी

error: Content is protected !!