चिंचवलीच्या महिला भगिनींची मार्लेश्वर-गणपतीपुळे-महाकाली यात्रा संपन्न

उद्योजक रफिक नाईक यांचे आयोजन

पावसाळी वातावरणात श्रद्धा आणि एकतेचे दर्शन घडवणारी यात्रा नुकतीच संपन्न झाली. चिंचवली मधील वाडीतील सर्व माता-भगिनींसह लहान मुलांसाठी खारेपाटण येथील उद्योजक रफिक नाईक यांच्या सौजन्याने मार्लेश्वर, गणपतीपुळे आणि आडीवरे येथील श्री महाकाली देवीच्या दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर, श्री क्षेत्र गणपतीपुळे पावस आणि श्री महाकाली देवी मंदिर या तीनही ठिकाणी भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेतले. पावसाच्या सरींमध्ये सुद्धा सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून येत होता.

या यात्रेदरम्यान महिलांनी एकत्रितपणे भजन, पूजा आणि प्रार्थना करून वातावरण भक्तिमय केले. निसर्गरम्य कोकणातील समुद्रकिनारा आणि डोंगरदऱ्यांचा आनंदही सर्वांनी घेतला.70 महिला व लहान मुले यामध्ये सहभागी झाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे.

गावातील महिलांना धार्मिक स्थळांचे दर्शन घडवून सामाजिक बांधिलकी वाढवण्याचे महत्वाचे कार्य रफिक नाईक यांनी केले. त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी बोलताना श्री. रफिक नाईक म्हणाले, “गावातील माता-भगिनींना वर्षातून एकदा तरी एकत्रितपणे देवदर्शनाचा आनंद मिळावा हा या उपक्रमामागील उद्देश आहे. पुढेही असे सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवले जातील.”

या यात्रेसाठी सर्व महिलांनी उद्योजक रफिक नाईक यांचे व आयोजकांचे मनापासून आभार मानले.

error: Content is protected !!