कणकवलीतील अन्वर नाईक यांचे निधन

जुन्या काळातील वाहनांचे कणकवली शहरातील मेकॅनिक अन्वर उस्मान नाईक (59 कणकवली पटकी देवी मंदिरा नजीक) यांचे आज उपचारादरम्यान वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग या ठिकाणी निधन झाले. जुन्या काळात दुचाकी सह अन्य वाहनांचे शॉक अँब्झॉर्बर चे मेकॅनिक म्हणून ते परिचित होते. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. गेले काही दिवस ते आजारी असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय ओरोस या ठिकाणी उपचार घेत होते. त्यांच्यावर हरकुळ येथील कब्रस्तान मध्ये दफन विधी करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, बांधकाम व्यवसायिक आसिफ नाईक, ठेकेदार अनिस नाईक यांचे ते सख्खे चुलत बंधू होत. तर जुन्या काळातील लाकूड व्यावसायिक अब्दुल नाईक यांचे ते सख्खे पुतणे होत.






