फोंडाघाट मतदार संघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार!

जि. प. सदस्य राजन चिके यांच्यासहित लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन केली नुकसानीची पाहणी

एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता नये याची काळजी घ्या

राजन चिके यांचे प्रशासनाला आदेश

कणकवली तालुक्यात फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघामध्ये दुष्काळ ची स्थिती असून यामुळे हाता तोंडाशी आलेले भात पीक धोक्यात आले आहे. या दुष्काळग्रस्त भागाची या भागाचे जिल्हा परिषद सदस्य राजन चिके यांनी पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवा. एकही शेतकरी पंचनामा झाला नाही म्हणून नुकसान भरपाई पासून वंचित राहता नये या दृष्टीने काम करा असे सांगितले. या दुष्काळग्रस्त स्थितीमुळे भात शेती 100 टक्के धोक्यात आली असून या दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे येत्या काळात या शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई द्यावी जेणेकरून या भात पिकावर शेतकरी वर्षभर अवलंबून असतात तो विचार करून ही भरपाई दिली जावी अशी मागणी शासनाजवळ करण्यात येणार असल्याचे ही श्री चिके यांनी या पाहणी नंतर सांगितले. यावेळी फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघातील घोणसरी येथे दुष्काळ ग्रस्त भात पिक पंचनामा करत असताना पंचायत समिती सदस्य मानसी मराठे,सरपंच प्रसाद राणे,उपसरपंच अंकिता परब,पोलिस पाटील भालचंद्र राणे , ग्राम महसूल अधिकारी जी. व्हि. शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश गोसावी,विलास मराठे, एकनाथ परब, सुभाष परब, विश्वनाथ परब,बबन साळसकर आदी शेतकरी हजर होते. त्यानंतर लोरे नं.1, गांगेश्वर या गावामध्ये दुष्काळामुळे नुकसान झालेल्या भात पिकांची पाहणी करण्यात आली. यावेळी सरपंच अजय रावराणे, मंडळ कृषी अधिकारी झुलपे, उप कृषी अधिकारी वेर्लेकर, ग्रामपंचायत अधिकारी राकेश गोवळकर, पोलिस पाटील अमित राणे, ग्राम पंचायत सदस्य आणि शेतकरी हजर होते. या विभागातील भात शेती पंचनामे व नुकसानीच्या पाहणी दरम्यान माजी सभापती संतोष कानडे, सरपंच प्रविण पन्हाळकर, उपसरपंच विजय मुरकर,कृषी सहाय्यक निलेश कावले ,ग्रामपंचायत सदस्य संजय ढवण, तन्वी गुरव, दामू नारकर, बाबु घाडी,सुनील वंजारे,विठोबा साळसकर,सुरेश तेली,दीपक गुरव,तुषार गुरव,शुभम गुरव,मंगेश सुतार,साहिल गुरव,रोहित गुरव, अनुजा राणे, सरपंच
स्नेहल नेवगे उपसरपंच तुकाराम गुरव सदस्य रविंद्र सावंत सदस्य अय्याज हवालदार ग्रामपंचायत अधिकारी अनंत राणे पोलिस पाटील, विजय सावंत पोलिस पाटील,गुरव पोलिस पाटील
कावले कृषी सहाय्यक ग्रामस्थ सचिन राणे, मंगेश नेवगे माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व शेतकरी महेंद्र राणे, सुधाकर राणे, संजय राणे, सुशांत सावंत,
दत्ताराम लाड,ग्रामपंचायत कर्मचारी सुनिल राणे, रविंद्र राणे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य राजन चिके यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानी प्रति दाखवलेल्या तत्परतेबद्दल शेतकऱ्यांमधून यावेळी समाधान व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!