वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठात १५ ऑक्टोबर रोजी ललितोत्सव

वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुवार १५ ऑक्टोबर रोजी श्री स्वामी समर्थ मठात ललित पंचमी उत्सवानिमित्त श्री स्वामी समर्थ यांचे आदिशक्ती आदिमाया स्वरूपात दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्त सकाळी पहाटे पाच वाजता मंगल स्नान, सात वाजता नित्य आरती, सकाळी नऊ वाजता खास महिलांसाठी श्रीनगर कुमकुम अभिषेक व तीर्थप्रसाद दुपारी बारा वाजता महाआरती, महाप्रसाद, सायंकाळी स्थानिकांची भजने, सायंकाळी पाच वाजता श्री स्वामी समर्थ सामुदायिक नाम जप, सायंकाळी सात वाजता नित्य आरती आणि साडेसात वाजता माऊली वारकरी दिंडी भजन मंडळ मोरवे बुवा विनोद कांदळगावकर पखवाज गुरुनाथ कांदळगावकर यांचे दिंडी भजन सादर होणार आहे, तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा. तसेच ज्या स्वामी भक्तांना अन्नदान सेवेत वस्तू रुपी किंवा देणगीरुपी मदत द्यायची असेल त्यांनी स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे संपर्क साधावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी तर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!