एसटी सावंत यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी

खासदार नारायण राणे यांनी केला शोक व्यक्त
एस. टी. सावंत यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावणारी आहे. एक निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा पदाधिकारी आज आपल्यातून निघून गेला, ही मोठी हानी आहे. पक्ष संघटनेत काम करताना एस. टी. सावंत यांनी नेहमी प्रामाणिकपणा आणि निष्ठेला महत्त्व दिले. शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कार्यासोबतच मराठा समाजासाठीही त्यांनी सक्रियपणे योगदान दिले. त्यांच्या रूपाने एक समर्पित सहकारी आणि संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता आपण गमावला आहे.
त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे. परमेश्वराने दिवंगत एस. टी. सावंत यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. अशा शब्दात खासदार माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एसटी सावंत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.






