राज्य उत्पादन शुल्क विभागाची कणकवलीत गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर मोठी कारवाई

6 लाखांची दारू व वाहन मिळून 12 लाखांचा मुद्देमाल जप्त
विदेशी दारूची वाहतूक करत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाई मध्ये तब्बल 6 लाख दहा हजारांची दारू जप्त करण्यात आली. कणकवली येथील दारिस्ते पवारवाडी येथे फोंडयाच्या दिशेने जाणा-या वाहनाची तपासणी दरम्यान ही कारवाई करण्यात आली., गोवा बनावटीची दारू व वाहन असे मिळून 12 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कारचालक नितीन ज्ञानदेव वासुदेव, (वय ३४ वर्षे रा. भेंडवडे वासुदेव गल्ली स्मशान भूमीजवळ, ता. हातकंणगले जिल्हा कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार एक सिल्वर रंगाची स्वीप्ट कार क्रमांक MH-१२-LV-९६९१ मध्ये विविध प्रकारचे विदेशी दारूची वाहतूक होत असल्याबाबत या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईमध्ये गोवा राज्यनिर्मित विदेशी मदयाचे विविध ब्रँड चे ३९ बॉक्स जप्त करण्यात आले. यामध्ये ६,१०,१३०/- व कारची किंमत रु. ६,००,०००/- व इतर मुद्देमाल असा एकूण रु. १२,१०,१३०/- किंमतीचा मुदेदमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कारचालक नितीन ज्ञानदेव वासुदेव, वय ३४ वर्षे रा. भेंडवडे वासुदेव गल्ली स्मशान भूमीजवळ, ता. हातकंणगले जिल्हा कोल्हापूर यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई विजय चिंचाळकर, विभागीय उपआयुक्त, व श्रीमती किर्ती शेडगे, अधीक्षक सिंधुदूर्ग यांच्या मार्गदर्शनानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नितीन शिंदे, श्रीमती स्नेहल कुवेसकर व अजित गावडे जवान व श्री. हेमत वस्त, जवान-वाहनचालक यांनी सदरची कारवाई केलेली असून त्यांमध्ये मदतनीस म्हणून साजीद शहा, सल्लाउद्दीन खान यांनी मदत केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. नितीन शिंदे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कणकवली करीत आहेत.
दिगंबर वालावलकर कणकवली






