मैत्रीदिनी वालावलमध्ये हरित संकल्प

युवा संघर्ष मित्रमंडळाचा वृक्षारोपण उपक्रम

अर्चना बंगे यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक

आंतरराष्ट्रीय मैत्रीदिनाचे औचित्य साधत वालावल येथील युवा संघर्ष मित्रमंडळाने गावात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम राबविला. गावाच्या विकासाबरोबरच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी युवकांनी घेतलेला हा पुढाकार अत्यंत कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे यांनी केले.
या उपक्रमांतर्गत गावातील विविध ठिकाणी सिताफळ, आंबा, कडुलिंब, बेल, बकुळ, अशोक तसेच विविध औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. यावेळी बोलताना सौ. बंगे म्हणाल्या की, सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनासाठी युवकांनी पुढाकार घेणे ही प्रेरणादायी बाब आहे. कु. पूजा राऊळ, सागर पाटकर, हेमंत वालावलकर यांच्यासह युवा संघर्ष मित्रमंडळातील सर्व कार्यकर्ते गावाच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आहे.
या वृक्षारोपण उपक्रमाला जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनीही भेट देऊन युवकांचे अभिनंदन केले.
यावेळी करुण राऊळ, सागर पाटकर, भाग्यश्री राऊळ, पूजा राऊळ, विशाल राऊळ, हेमंत वालावलकर, अभय मांजरेकर, अक्षय सारंग, योगेश वालावलकर, गौरव पेडणेकर, आपा वालावलकर, बाळा पार्सेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!