कणकवली शहरातील पटवर्धन चौकातील महसूल ची जागा नगरपंचायत ला भाजी मार्केट साठी द्या!

कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची महसूल मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
कणकवली नगरपंचायत हद्दीत आपासाहेब पटवर्धन चौक येथे जुने भाजी मार्केट असून लगतची जागा स.नं./ हि.नं.१९८ व १ क्षेत्र ०.०७ हि जागा महसुली विभागाची आहे. ती नगरपंचायत भाजी मार्केटमध्ये वर्ग करून द्यावी. अशी मागणी कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, निखिल आचरेकर, राजा पाटकर आदी उपस्थित होते. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, जेणेकरून कणकवली भाजी मार्केट सुसज्ज होईल. यासंबधी सर्व पत्रव्यवहार मा. कोकण आयुक्त व मा. जिल्हाधिकारी यांना करण्यात आला आहे तरी आपण आपल्या अधिकारात त्या जागेबाबत लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन ती जागा नगरपंचायतला वर्ग करावी हि विनंती.






