शाब्बास ! पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जपली संवेदनशीलता !

पिडीत कुटुंबाला केली आर्थिक मदत

निलेश जोशी । कुडाळ : आपल्याच एका विद्यार्थी मित्रावर ओढवलेल्या संकटात त्याला मदत करून मानवता धर्म आणि संवेदनशीलता जपण्याचे काम पाट हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी केले.
इयत्ता आठवीतील कुमार राजाराम विलास राऊळ या विद्यार्थ्याचे घर शॉर्ट सर्किटने जळले. घरातील धान्य, कागदपत्र , महत्त्वाचे सर्व साहित्य जळून खाक झाले. कुमार राजाराम विलास राऊळ याच्या कुटुंबावर संकट ओढवले हे लक्षात घेता. संस्था आणि मुख्याध्यापक यांच्यातर्फे मुलांना, शिक्षकांना मदतीचे आवाहन करण्यात आले. अगदी गरीब परिस्थिती असताना शालेय जीवनात ओढवलेले हे संकट पाहता धीर देण्याकरिता आपल्या खाऊसाठी दिलेल्या पैशातून पस्तीस हजार रक्कम जमा करून देण्यात आली.
याप्रसंगी संस्थाचालक सुधीर ठाकूर यांनी सांगितले की दुसऱ्याचे दुःख जाणण्यासाठी आपली संवेदनशीलता जागृत पाहिजे आणि असा प्रसंग कोणावर कधी ओढवेल हे सांगता येत नाही. त्यामुळे ही मदत म्हणजे या संकटातील खारीचा वाटा आहे. ही मदत त्यांच्याकडे आम्ही सुपूर्द करत आहोत. याप्रसंगी पर्यवेक्षक हंजनकर सर, संस्थाचालक देवदत्त साळगावकर, सुभाष चौधरी, शिक्षक प्रतिनिधी केरकर सर, श्री बोंदर सर, विलास राऊळ उपस्थित होते आभार संदीप साळसकर यांनी मानले.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!