माजी आमदार प्रमोद जठार यांना लॉटरी लागणार?

वाढदिवस शुभेच्छा प्रसंगी भाजपाच्या नेत्यांकडून संकेत

माजी खासदार निलेश राणे यांची जोरदार टोलेबाजी

भाजपामध्ये आल्यानंतर आम्ही भाजपामध्ये बरेच काही शिकलो. यात माजी आमदार असलेले आमचे मित्र प्रमोद जठार यांचा स्वभाव देखील भावला. कारण जे आहे तसं सामोर जायचं. कुणीतरी येणार म्हणून आपला वेश बदलायचा नाही. तर आहे त्या विषयात लोकांसमोर राहून लोकांची मने जिंकायची हे प्रमोद जठार यांचे खरे नेतृत्व गुण आहेत. पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे प्रमोद जठार यांना कुठूनही तिकीट मिळू दे त्यांच्यासाठी माझ्या स्वतःच्या निवडणुकी एवढा फिरून काम करणार असे सांगत येत्या काळात लोकसभा निवडणुकी करता प्रमोद जठार हे उमेदवार असू शकतात अशी अप्रत्यक्ष संकेत माजी खासदार निलेश राणे यांनी दिले. तर याच दरम्यान श्री. जठार यांना येत्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे पद देखील मिळू शकते असे संकेत आजच्या या कार्यक्रमादरम्यान दिले गेले. कासार्डे येथील प्रमोद जठार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपाचे प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे बोलत होते. यावेळी श्री. राणे यांनी जोरदार फटकेबाजी करत प्रमोद जठार यांना आपल्या हटके स्टाईलने शुभेच्छा दिल्या. प्रमोद जठार हे पारंपारिक भाजपाचे. पण तुम्हाला वाटत असेल की राजन तेली ही पारंपरिक भाजपाचे आहेत. तर तसं नाही पण ते भाजपाचे पारंपरिक असल्याचे भासवतात. अशी जोरदार टोलेबाजी देखील श्री. राणे यांनी केली. आम्हाला बीजेपी राजन तेलींकडून शिकायला मिळते मात्र ती देखील शिकण्याची गरज आहे. असे सांगत श्री राणे यांनी आजच्या या शुभेच्छांच्या कार्यक्रमात जोरदार टोले बाजी केली. रिफायनरीचा प्रश्न लोक विसरली होती. मात्र जठार यांनी तो विषय परत परत मांडून ताजा ठेवला. ज्या वेळी रिफायनरी होईल त्यावेळी पहिली पाटी प्रमोद जठार यांची लागेल असे गौरव उद्गार देखील श्री. राणे यांनी काढले. यावेळी व्यासपीठावर सौ. नीरजा जठार, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!