ब्रेन डेव्हलपमेंट बीडीएस परीक्षेत मुलांचे उज्ज्वल यश

कुडाळ : ८ जानेवारी २०२३ रोजी देशस्तरावर घेतल्या गेलेल्या बीडीएस या परीक्षेत कुडाळच्या पडतेवाडी शाळेतील इयत्ता तिसरीच्या मुलांनी उज्वल यश संपादन केले आहे.
कु. दुर्वा रवींद्र प्रभू हिला ९७ गुण मिळून तिला सुवर्णपदक प्राप्त झाले. तिने जिल्ह्यात २ री व देशात ७१ वी येण्याचा मान मिळवला आहे.
कारूण्या निलेश परब (गुण ९५ रौप्य पदक), सुयश शिवाजी पवार (गुण ९१ रौप्य पदक), मुग्धा प्रियदर्शनी कुडव (गुण ८८ कांस्यपदक), तेज विवेकानंद केरकर (गुण ८७ कांस्यपदक), हास्या गणेश कावले (गुण ८६ कांस्यपदक).
तसेच इयत्ता पहिलीमधील गार्गी स्वप्नील तेरसे (गुण ९५ सुवर्ण पदक), स्वरा शक्ती देसाई (गुण ८३ कांस्यपदक) यांनी देखील घवघवीत असे यश मिळवले आहे.
या सर्व मुलांना त्यांच्या शाळेतील शिक्षक, पालक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांना सुवर्णा विजय प्रभूतेंडोलकर यांचे विशेष असे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
प्रतिनिधी, कुडाळ