मुंबई गोवा महामार्गावर पावशी येथे भीषण अपघात ; कार चालक जखमी

मुंबई – गोवा महामार्गावर पावशी येथे भीषण अपघात झाला या अपघातात कारचालक जखमी झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावर पावशी बेल नदी नजीक भीषण अपघात घडला.
अल्टो कार कणकवली हून गोव्याच्या दिशेने जात होती तर विरुद्ध दिशेनी येणारी जीप कार यांची समोरासमोर धडक बसली. या धडके मध्ये अल्टो कारचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून अल्टो कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे मुबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटना स्थळी कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत केली. अपघातचे नेमके कारण काय आणि हा अपघात कशाने झाला याचे तपास पोलिस करत आहे.

error: Content is protected !!