कुडाळ न्यायालयात “वरिष्ठजन अधिकार सशक्तीकरण और गरिमा” या कार्यक्रम

ज्येष्ठ नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांची दिली माहिती

कुडाळ येथील दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांच्या संयुक्त विदयमाने दिवाणी न्यायालय कुडाळ येथे दिनांक १५ जून २०२६ रोजी, कुडाळ दिवाणी न्यायालयचे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती नम्रता अमेय बकरे यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ नागरीकांसाठी “वरिष्ठजन अधिकार सशक्तीकरण और गरिमा” या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.
जेष्ठ नागरीकांना कायदेशीर मदतीसाठी अर्ज, कल्याणकारी योजना आणि “पालक व जेष्ठ नागरिक निर्वाह आणि कल्याण अधिनियम, २००७” अंतर्गत उपलब्ध असलेल्या उपाय योजनांबाबत माहिती देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उददेश आहे. या कार्यक्रमात जेष्ठ विधिज्ञ आर डी बिले, कुडाळ वकील संघटना व विधीज्ञ दत्तात्रय देसाई यांनी विधी सेवा प्राधिकरणांमार्फत उपलब्ध असलेल्या विविध योजना व मदत याविषयी मार्गदर्शन केले. तसेच कुडाळ दिवाणी न्यायालयच्या सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती नम्रता अमेय बकरे यांनी विविध योजनांचा जेष्ठ नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाला जेष्ठ नागरीक, वकील वर्ग, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!