बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे हिंदी राष्ट्रीय परीक्षेत नेत्रदीपक यश

कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्थान आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हिंदी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेतील कु वेदांत वैभव पालव (इयत्ता तिसरी) व कु वेदांत विठोबा सावंत (इयत्ता नववी) या दोन विद्यार्थ्यांना महात्मा गांधी राजभाषा प्रतिभावंत पुरस्कार मिळाला. तसेच ६८ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. चैताली बांदेकर, शाळेच्या हिंदी शिक्षिका प्राजक्ता जाधव, सौ. शमिका भिसे व इतर शिक्षकवृंद तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीबरोबरच शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
शाळेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी हिंदी विषयात प्रगती करण्यासाठी प्रेरणादायक ठरले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षक व पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!