कुडाळ दिवाणी न्यायालयात आंतरराष्टीय योग दिन साजरा

कुडाळ येथील दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विदयमाने दिवाणी न्यायालय कुडाळ येथे दिनांक २१ जून २०२६ रोजी, कुडाळ दिवाणी न्यायालयचे दिवाणी न्यायाधीश श्री. जी. ए. कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली “आंतरराष्टीय योग दिन” साजरा करण्यात आला.
योग हा फक्त एक दिवसाचा उत्सव नसून रोजच्या जीवन शैलीचा भाग झाला पाहिजे हा या योग दिनाचा मुख्य उददेश आहे. असा संदेश यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमात कुडाळ दिवाणी न्यायालयचे दिवाणी न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांनी रोजच्या कार्यालयीन कामकाजामुळे होणारा ताण तणाव कमी करणेसाठी व रोग्य निरोगी रहाणेसाठी योग हा प्रभावी उपाय आहे असा संदेश कार्यक्रमात उपस्थित वकीलवर्ग व न्यायालयीन कर्मचारी यांना दिला. तसेच प्राणायाम, सुर्यनमस्कार अशा विविध प्रकारचे योगासने घेवून सदर आंतरराष्टीय योग दिन साजरा करणेत आला





