राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी घेतली खासदार व पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पार्थ पवार यांची भेट

खासदार झाल्याबद्दल केले अभिनंदन व सत्कार
खासदार व राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पार्थ पवार यांचे खासदार झाल्याबद्दल राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आज मुंबई येथे अजित दादा यांच्या देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी खासदार पार्थ पवार यांची भेट घेऊन खासदार झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्याचबरोबर जिल्हा राष्ट्रवादी संघटने बाबतीत चर्चा केली. त्यावेळी खासदार पार्थ पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांना आश्वाशित केले.





