आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये नवागतांचे दिमाखात स्वागत.

कणकवली/प्रतिनिधी

ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे प्रशालेत नवागतांचा स्वागत सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रशाला सज्ज झाली होती,सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम मिकी माऊस सोबत हस्तांदोलन केले नवीन शाळा, नवीन मित्र,नवीन पुस्तके, आणि शिकविणारे नवीन शिक्षक,या सगळ्याचा अनुभव घेताना सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
सर्व नवीन प्रवेश घेतलेल्या नर्सरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन प्रशालेत स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल सर, संस्थापक सचिव प्रा. हरिभाऊ भिसे सर,संस्थां संचालिका सौ. मनीषा सावंत मॅडम सल्लागार श्री. डी. पी. तानावडे सर,मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई, को ऑर्डिनेटर श्री. निलेश घेवारी सर,सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सौ. वैष्णवी मोरवेकर मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते,सांस्कृतिक विभाग प्रमुखांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले,सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर के.जी ते तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री. हेमंत पाटकर यांनी केले.

error: Content is protected !!