कणकवली लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी प्रा दिवाकर मुरकर

सामाजिक कामांचा दिवाकर मुरकर यांना आहे दांडगा अनुभव

कणकवली लायन्स क्लबच्या नुकत्याच झालेल्या सभेमध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून कणकवली तील सेवावृत्त प्राध्यापक दिवाकर मुरकर यांची अध्यक्षपदी तर सचिव पदी डॉ अशोक कदम यांची निवड करण्यात आली, त्याचप्रमाणे खजिनदार म्हणून डॉ प्रविण गोरूले, प्रथम उपाध्यक्ष विजय पोवार, द्वितीय उपाध्यक्ष नंदू सावंत यांची निवड करण्यात आली.
लायन्स क्लबचे विद्यमान अध्यक्ष डॉ प्रविण बिरमोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये ही निवड करण्यात आली यावेळी चार्टर प्रेसिडेंट डॉ बाळकृष्ण महाडेश्वर, जेष्ठ लायन सदस्य शामसुंदर महाडेश्वर, महेश काणेकर, विलास बुचडे, डॉ शमीता बिरमोळे, उपस्थित होते
प्रा दिवाकर मुरकर हे मागील दोन वर्षांपासून सचिव म्हणून कार्यरत होते ते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असून शैक्षणिक क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे तसेच ते सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मुरकर गुरूजी चारिटेबल ट्रस्ट विद्यमान अध्यक्ष म्हणून काम करत असून त्यांचा मोठा जनसंपर्क आहे, कणकवली नगरपंचायतीचे माजी स्विकृत नगरसेवक होते. या सर्वांचा फायदा लायन्स क्लबच्या पुढील वाटचालीसाठी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे लायन्स क्लबच्या पदाधिकारी यांचा शपथविधी सोहळा ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी डॉ प्रविण बिरमोळे यांच्या गुरूकृपा हॉस्पिटल तिसरा मजला सभागृहात आयोजित करण्यात आला आहे या निवडीचे शैक्षणिक, सामाजिक आणि सेवाभावी संस्था यांच्याकडून दिवाकर मुरकर यांचे अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!