खेती बचाओ अभियानातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

खेती बचाओ अभियानातून शाश्वत नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन

खेती बचाओ अभियानातून सेंद्रिय निविष्ठांची माहिती

किर्लोस कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग मध्ये खेती बचाओ अभियानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे. चालू खरीप हंगामात एल निनोचे परिणाम जाणऊ लागले आहेत. यंदा एल निनोच्या परिणामामुळे पाऊस उशिरा सुरू होणार आहे. तसेच पावसाचे दरवर्षीच्या तुलनेत सरासरी प्रमाण कमी असणार आहे. रासायनिक खतांचा असंतुलित वापर शेतकरी करत आहेत. यासाठी जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारने खेती बचाओ अभियान १ जून ते ३० जून या कालावधीत सुरू केले आहे. सिंधुदुर्ग मध्ये याची अंमलबजावणी कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने चालू आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना निम गरव्या व हळव्या जातींची लागवड करावी. सेंद्रिय व जैविक निविष्ठांची घरच्या घरी निर्मिती करून त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करावा. सिंचनाच्या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे, फळ बागांना नैसर्गिक आच्छादन करावे, रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा, जमिनीचे आरोग्य सुधारावे, पौष्टिक व रसायनमुक्त अन्न धान्याची निर्मिती करावी अशा विषयावर शेतकर्यांतना अभियानाच्या माध्यमातून कृषि विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ बाळकृष्ण गावडे, शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर, डॉ. विलास सावंत, विकास धामापूरकर, सुयश राणे, डॉ. केशव देसाई, विवेक सावंतभोसले, सौ. सुमेधा तावडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सौ. भाग्यश्री नाईकनवरे, उप प्रकल्प संचालक आत्मा गावोगावी जाऊन शेतकर्यांधमध्ये जनजागृती करण्यात येते. या अभियानाच्या माध्यमातून जिवामृत तयार करणे, दशपर्णी अर्क तयार करणे, बिजामृत तयार करणे, बीज प्रक्रिया करणे, गोकृपा अमृत तयार करण्याचे प्रात्यक्षिके दाखविण्यात येत आहे. याचा फायदा सिंधुदुर्ग मध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. या अभियानाच्या माध्यमातून १ जून पासून आतापर्यंत २० गावांमध्ये प्रचार करण्यात आला असून मार्गदर्शनाचा लाभ जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांूना होत आहे, अशी माहिती किर्लोस कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे यांनी दिली.

error: Content is protected !!