तेंडोलीत उद्या संयुक्त दशावतार नाटक

तेंडोली ग्रामस्थांच्यावतीने तेंडोली येथील श्री देव रवळनाथ पंचायतन येथे 15 जून रोजी रात्री 7.30 वाजता ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ हे काल्पनिक संयुक्त दशावतार नाटक होणार आहे. यात निवडक कलाकारांचा समावेश आहे.
यात महागणपती – प्रथमेश मेस्त्री, रिद्धी सिध्दी – सखाराम परब, चंडोल – दामोदर जोशी, आई – सुधीर तांडेल, श्याम – हरिश्चंद्र गांवकर, नवरा – काका कलिंगण, सुंदर – गिरिश राऊळ, कुंदन – संजय पाटील, राजा – संजय वालावलकर, शुभांगी – नितीन घाडी, आचार्य – दशावतारातील भिष्माचार्य यशवंत तेंडोलकर तर हार्मोनियम – अमोल मोचेमाडकर,
मृदुंगमणी – सौरभ मेस्त्री, झांज – प्रथमेश गावडे यांची संगीत साथ आहे. वावळेश्वर दशावतार मंडळ (तेंडोली) यांचे विशेष सहाय्य आहे. नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तेंडोली ग्रामस्थांनी केले आहे.





