तालुका स्कुल आणि कन्या शाळा इमारत दुरुस्ती करा !

अभिषेक गावडे यांची बांधकाम सभापतींकडे मागणी
कुडाळ शहरातील तालुका स्कूल व कन्या शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबत शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांनी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांना निवेदन दिले. याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत.
कुडाळ शहरातील तालुका स्कूलमध्ये सभा मंडपाची आवश्यकता आहे. तसेच त्या ठिकाणी असलेल्या कन्या शाळेच्या इमारत क्रमांक २ ची नादुरुस्ती झाली आहे. या इमारतीचे छप्पर मोडकळीस आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अध्यापन करणे कठीण होणार आहे, याचा विचार करून शिवसेना शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांची भेट घेऊन शाळेच्या परिस्थितीबद्दल चर्चा करून निवेदन दिले.
आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना बोलावून त्या ठिकाणी हा प्रश्न मार्गी काढण्यासाठी आदेश दिले. यावेळी नगरसेवक विलास कुडाळकर, उपशहर प्रमुख प्रथमेश केळबाईकर, अनुप शिरसाट उपस्थित होते.





