उज्वला योजनेचे गॅस सिलेंडर व लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांना वेळेत द्या अन्यथा ठाकरे शिवसेना महिला आघाडी आंदोलन छेडणार

ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख नीलम सावंत व शिष्टमंडळाचा तहसीलदारांना निवेदनाद्वारे इशारा

उज्ज्वला गॅस योजनेतील अनुदानित गॅस सिलेंडर ची संख्या १२ वरून आधी ९ केली, आणि आता ९ वरून थेट ४ करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब गृहिणींवर हा अन्याय आहे. त्याचबरोबर लाडकी बहिण योजने अंतर्गत दिले जाणारे पैसे पात्र असलेल्या लाभार्थ्यांना देखील मिळाले नाहीत. याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करत आहोत. उज्ज्वला गॅस आणि लाडकी बहिण योजेनेचे पैसे महिलांना मिळाले नाहीत तर सिंधुदुर्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल

      केंद्र सरकार व राज्य सरकार गरीबाला गरीब आणि श्रीमंताला अधिक श्रीमंत करण्याचे काम करत आहे. सरकारने कोणतेही धोरणात्मक निर्णय न घेतल्याने बेरोजगारी आणि गरिबीत वाढ होऊन जनता होरपळली जात आहे. देशात आणि महाराष्ट्र राज्यात वाढत असलेली अराजकता यासाठी केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी जबाबदार आहेत.सत्ताधाऱ्यांच्या या अपयशी कारभाराचा सिंधुदुर्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध नोंदवत आहोत.
error: Content is protected !!