फ्लाय९१ कडून प्रवाशांसाठी विशेष ‘स्मार्टबॅग९१’ सेवा

फ्लाय९१ ह्या प्रादेशिक विमान सेवेने ‘स्मार्टबॅग९१ ही नवीन ग्राहक-केंद्रित सेवा सुरू केली आहे. प्रवाशांसाठी अतिरिक्त सामानाची प्रक्रिया अधिकसोपी, पारदर्शक, त्रासमुक्त आणि परवडणारी करण्याच्या उद्देशाने हे सेवा सुरु करण्यात आली आहे.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, या सेवेअंतर्गत आता फ्लाय९१ कोणत्याही मार्गावर आगाऊ अतिरिक्त सामान अत्यंत सवलतीच्या दरात बुक करता येणार आहे. ही सुविधा केवळ आंतरराष्ट्रीय कनेक्टिंग प्रवासापुरती मर्यादित नसून संपूर्ण फ्लाय९१ नेटवर्कवर उपलब्ध आहे. प्रादेशिक विमानवाहतुकीत ग्राहकांसाठी अशा प्रकारची सुविधा प्रथमच उपलब्ध करण्यात आली आहे.
‘कनेक्टिन्ग भारत’ या ध्येयातून सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रादेशिक हवाई सेवा देण्याच्या फ्लाय९१ च्या प्रयत्नांचा भाग म्हणून स्मार्टबॅग९१ सुरू करण्यात आले आहे. अतिरिक्त सामानाशी संबंधित अनिश्चितता आणि जास्त शुल्क ही प्रवाशांची एक मोठी समस्या मानली जाते, त्यावर हा सेवा प्रभावी उपाय ठरणार आहे.
या योजनेअंतर्गत प्रवासी बुकिंगच्या वेळीच ५ किलो ते ३० किलोपर्यंत जादा सामानाचे पर्याय निवडू शकतात. यासाठीचे दर ₹१००० पासून सुरू होऊन ३० किलो जादा सामानासाठी केवळ ₹३००० पर्यंत आहेत.
घरी परतणारे प्रवासी, स्थलांतर करणारे विद्यार्थी, व्यावसायिक दौऱ्यावर जाणारे, कुटुंबासह प्रवास करणारे किंवा लांब प्रवासासाठी अधिक सामान घेऊन जाणारे ग्राहक यांच्यासाठी स्मार्टबॅग९१ अधिक निश्चितता आणि लवचिकता प्रदान करते.
“स्मार्टबॅग91 द्वारे आम्ही आमच्या ग्राहकांचे प्रवास निर्णय अधिक सोपे करण्याचा प्रयत्न करत आहोत. सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रादेशिक हवाई सेवेद्वारे ‘Connecting Bharat’ चे ध्येय पुढे नेत असताना प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि त्रासमुक्त बनवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. विशेषतः हैदराबाद आणि बेंगळुरू सारख्या महत्त्वाच्या हबमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अधिक उपयुक्त ठरेल,” असे फ्लाय९१चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको म्हणाले.
ही सेवा जागतिक विमानवाहतूक धोरणांशी सुसंगत असून प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार सामानाचे पर्याय निवडण्याची मुभा देतो, तसेच विमानतळावर शेवटच्या क्षणी होणारी गैरसोय टाळण्यास मदत करतो.
डिजिटल-फर्स्ट दृष्टिकोनाचा भाग म्हणून FLY91 ग्राहक-केंद्रित सेवा अधिक सक्षम करत आहे. WhatsApp द्वारे ऑटो चेक-इन, UPI आधारित QR-सक्षम इनफ्लाइट सेवा आणि सुलभ प्रवासी प्रक्रिया यांसारख्या सुविधा यामध्ये समाविष्ट आहेत.
गोव्यात मुख्यालय असलेली फ्लाय९१ सध्या भारतातील १२ शहरांना जोडते. यामध्ये गोवा (मोपा), पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, सोलापूर, जळगाव, सिंधुदुर्ग, कोची, अगत्ती, राजामुंद्री, विजयवाडा आणि हुबळी यांचा समावेश आहे.





