शासकीय मैदानाची अखेर नगर पंचायतकडून सफाई

मंदार शिरसाट यांच्याच प्रभागात अस्वच्छता
गटनेता विलास कुडाळकर यांनी वेधले लक्ष
येथील तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या शासकीय मैदानामधील दारूच्या बाटल्यांचा खच अखेर कुडाळ नगर पंचायतीने या परिसराची स्वच्छता केली आहे. परिसरातील स्वच्छता कुडाळ नगरपंचायतीमार्फत करण्यात आली आहे. दरम्यान नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या प्रभागात हे मैदान येत असल्याने त्या ठिकाणी त्यांनी लक्ष घालून जबाबदारी समजून स्वच्छता केली पाहिजे होती असं नगरसेवक विलास कुडाळकर यांनी म्हटलं आहे.
कुडाळ तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या शासकीय मैदानामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच तसेच काचांचा खर् मोठ्या प्रमाणावर असल्याच उबाठा नगरसेवक मंदार शिरसाट यांनी निदर्शनास आणलं होत. तसेच या मैदानाची स्वच्छता करण्यासाठी उपक्रम हाती घेणार असे जाहीर केले होत. ही वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर कुडाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांमार्फत मैदानावरील दारूच्या बाटल्या आणि काचा तसेच परिसर स्वच्छ करण्यात आला. याबाबत स्वच्छता विभागाला तशा सूचना देण्यात आल्या होत्या त्यामुळे हा परिसर स्वच्छ करण्यात आला असे गटनेता विलास कुडाळकर यांनी सांगितल.
याबाबत गटनेता विलास कुडाळकर यांनी सांगितले की, मैदानावर असलेल्या दारूच्या बाटल्या व काचा हे योग्य नाही पण हा प्रभाग नगरसेवक मंदार शिरसाट यांचा आहे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी या मैदानाच्या स्वच्छतेकडे तसेच मैदानावर चाललेल्या गैर प्रकाराकडे लक्ष देऊन संबंधित प्रशासनाला तशा सूचना देणे गरजेचे होत्या स्वच्छता मोहीम राबवण्यापेक्षा आपली जबाबदारी समजून नगरपंचायतीकडून ही स्वच्छता करून घेणे गरजेचे होते मात्र त्यांनी स्वच्छता मोहीम राबवून आपल्या प्रभागात किती अस्वच्छता आहे हे दाखवून दिले आहे.





