ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा दहावीचा निकाल 100% टक्के

कणकवली/मयूर ठाकूर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा एस.एस.सी 2026 चा निकाल जाहीर झाला. आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स वरवडे च्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले 90% च्या वरती 12 विद्यार्थी 80% च्या वर 20 विद्यार्थी आहेत.
विशेष प्रविण्यासह 37 विद्यार्थी उत्तीर्ण, प्रथम श्रेणीत 16 विद्यार्थी उत्तीर्ण , द्वितीय श्रेणीत 7 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रथम क्रमांक
कु. लिशा रुपेश जाधव (493/500) 98.60%
द्वितीय क्रमांक
कु. सुश्रुत मंदार नानल ( 491/500) 98.20%
तृतीय क्रमांक
कु. ख़ुशी विशाल आमडोस्कर (483/500) 96.60%
कु. मोहन संभाजी नांदगावकर (483/500) 96.60.
चतुर्थ क्रमांक
कु. निधी अमित कदम ( 468/500) 93.60%
पाचवा क्रमांक
कु. आदित्य अनिरुद्ध गुप्ता ( 467/500) 93.40%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री मोहन सावंत सर, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर, खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम,सल्लागार डी.पी तानावडे सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे





