तळेरे येथे आज आमदार प्रमोद जठार यांचा जाहीर सत्कार

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव प्रमुख प्रमोद जठार यांची महाराष्ट्र राज्य विधान परिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल, नियोजन तळेरे तालुका कृती समिती आणि तळेरे ग्रामपंचायत यांच्या वतीने शुक्रवार, ८ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम तळेरे एसटी स्टँडसमोरील ब्रिजखाली असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रंगमंच येथे पार पडणार आहे. यावेळी गावाच्या वतीने आमदार प्रमोद जठार यांचे स्वागत व सत्कार करण्यात येणार असून, गावातील विविध प्रमुख समस्यांबाबत त्यांना लेखी निवेदनही सादर करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास तळेरे गावातील सर्व ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्था, मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला बचत गटांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नियोजन तळेरे तालुका कृती समितीचे अध्यक्ष चंद्रकांत (राजू) जठार, तळेरे सरपंच हनुमान तळेकर, माजी पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, कृती समिती उपाध्यक्ष शरद वायंगणकर आणि सचिन संजय खानविलकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!